Wednesday, October 12, 2016

सुरुवात

      लोक ब्लॉग्स वर लिहतात हे ऐकलं होतं .वाचलेही होतं .आत्ताच एकीचा ब्लॉग वाचला आणि मग म्हंटलं आपण पण ब्लॉग बनवू स्वतःचा !! जिथे मनातला सगळं लिहता येईल
      लिहायला चालू केलं खरं पण काय लिहू आणि काय नको असा झालंय . कुठून सुरवात करू तेच कळत  नाहीये . एप्रिल २०१४ पासून मी अमेरिकेत आहे. म्हणजे तशी मागच्या वर्षी २ महिने मी भारतात गेले होते पण बाकी इथेच आहे .त्यामुळे मग विचार केला कि अमेरिकेबद्दलच लिहू . पण त्या आधी मी इथे कशी आले त्याबद्दल थोडंसं सांगते . 
        २०१३ मध्ये माझं लग्न झालं . नवरा सॉफ्टवेअर कंपनी मध्ये नोकरीला .  मला लहानपणापासूनच इतर देशांबद्दल खूप आकर्षण आहे . लहानपणी ऐकलं होतं . कि ओळखीच्यांचा किंवा नात्यातल्या कोणी इतर देशात शिकायला किंवा नोकरीसाठी गेलं आहे . तेव्हा वाटायचं कि आपल्याला पण जायला मिळालं पाहिजे एकदातरी दुसऱ्या देशात . मी १२ वि मध्ये असताना माझ्या आईनी युरोप टूर केली होती तेव्हा तिनी सांगितलं होतं कि तिथे सगळं कसं सुंदर भव्य दिव्य आहे . माझे बाबा पण पूर्वी नोकरीनिमित्त स्वित्झर्लंड ला जाऊन आले होते . 
       इतर लोकांप्रमाणेच माझंही स्वप्न होतं परदेशात जाण्याचं .कधी पूर्ण होईल का नाही याचा विचार केला नव्हता पण लग्नासाठी मुलं बघताना मी ठरवलं होतं कि सॉफ्टवेअर कंपनी मधला मुलगा शक्यतो बघायचा म्हणजे पगार पण चांगला असतो आणि त्या लोकांना परदेशात जायची संधी पण असते आणि तसाच ठरवल्याप्रमाणे मला सॉफ्टवेअर कंपनी मध्ये काम करणारा मुलगा मिळाला सुद्धा. 
         आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही पुण्यातच होतो . त्याचा जॉब बाणेर ला होता आणि माझी चांगली मैत्रीण अर्चना बालेवाडी ला म्हणजे बाणेर च्या जवळच राहायची मग बरेचदा आम्ही बरोबर निघायचो तो मला तिच्याकडे सोडून मग ऑफिस ला जायचा आणि घरी जाताना बरोबर जायचो . तो दिवसभर ऑफिस मध्ये असायचा आणि आम्ही तिच्याकडे मस्त गप्पा मारायचो खाली चक्कर मारून यायचो दुपारी चहा मग कधी बाहेर पाणीपुरी किंवा वडापाव खायचो खूप मजा यायची .
        बाकी जेव्हा मी घरी असायचे तेव्हा कंटाळून जायचे कारण रात्री उशीर होणार म्हणून तो दुपारी ११ ११.३० ला निघायचा पण रात्री त्याला घरी यायला ९ कधी १० व्हायचे असं कधीच व्हायचं नाही कि तो ६-७ वाजता घरी आलाय मी खूप कंटाळून जायचे . 
         आधी ४-५ वर्ष मी जॉब केला होता पण त्यात ३ शिफ्ट्स असायच्या . कधी सकाळची शिफ्ट, कधी दुपार तर कधी रात्र . त्याचा पण कंटाळा आला होता म्हणून नंतर जॉब सोडला होता . लग्नानंतर परत जॉब करायची iccha नव्हती . तो गेल्यावर मी कॉम्पुटर वर नेट सर्फिंग करायचे tv बघायचे कधी झोपायचे . संध्याकाळी एक लांब चक्कर मारून येताना भाजी आणणे कधी पाणीपुरी खाणे असा माझा ठरलेला कार्यक्रम असायचा . पण हे सगळं करून आले कणिक  भिजवून ठेवली भाजी केली कुकर लावला तरी याचा काही पत्ता नसायचा .भूक लागली कि मी ९ कधी ९.३० ला जेवून घ्यायचे मग खूप कंटाळा यायचा              असं वाटायचं इतकं काय काम असतं . IT वाल्या लोकांना काही स्वतःच असं आयुष्यच नाही का . मग असं करता करता काही महिने गेले. मी खूप कंटाळले होते त्याच्या नोकरीच्या वेळेला . त्यावर आमचा बरेचदा बोलणं पण झालं होत आणि तो म्हणाला पण होता कि मला चान्स आहे onsite चा तो नाही मिळाला तर मी २०१४ मध्ये म्हणजे नवीन वर्षात नोकरी बदलीन . 
       नवीन वर्ष चालू झालं . आम्ही जानेवारी मध्ये मुंबईला जाऊन व्हिसा interview देऊन आलो .तो क्लिअर झाला होता. त्यामुळे आता जायला मिळेल हे कळलं होतं पण कधी काय काहीच माहित नाही . विचारलं कि हा म्हणायचा कि सगळं झालं आहे पाठवणार आहेत पण कधी ते माहित नाही . मी काही नातेवाईक आणि जवळच्या मित्रमैत्रिणींना सांगून ठेवलं होतं हे . पण कधी काय काहीच माहित नव्हतं त्यामुळे वाटायचं कि खरंच पाठवणार आहेत कि नाही . कारण सांगितल्यावर लोक नंतर विचारतात कि कधी जाणारे मग तेव्हा काय सांगायचं कि आम्हालाच अजून माहित नाही . मग मी पण त्याच्या मागे लागले कि अरे विचार ना कधी पाठवणार आहेत.  
        असं करता करता जानेवारी फेब्रुवारी २ महिने गेले . मार्च मध्ये त्याला समजलं कि मार्च च्या ३ ऱ्या आठवड्यात finally पाठवणार आहेत. कंपनीने तिकीट काढलं .तो तिथे गेल्यावर थोडे दिवसांनी मला बोलावेल असं आमचं ठरलं होतं .नंतर मी एकटी शॉपिंग कुठे करणार म्हणून दोघांचं शॉपिंग एकत्रच करू असं ठरवलं मग दोघांच्या २-२ मोठ्या सुटकेस १-१ लहान सुटकेस, कपडे, थंडीसाठी जॅकेट , थर्मल वेअर बाकी सामान अशी खरेदी झाली आणि २२ मार्च ला हा अमेरिकेसाठी रवाना झाला